नोंदणी करून ऐका, ‘एकं’वरील साहित्य आणि ‘एकोपा’ अंकांची झलक!

Sign up to listen to Aickum audio content and a sampling of Ekopa audio issues.

शहाण्याला शब्दाचा


नियमबद्ध शब्दकोडे

म्हणजे शब्दकोड्याचे ‘न्यू यॉर्क टाईम्स’ ने प्रमाण मानलेले नियम पाळणारे


अर्थात्

अर्थात् हे सर्वस्वी नवीन कोडे मी एकताच्या ऑक्टोबर २०१९ च्या अंकात प्रथमच सादर केले होते.


खिरापत

नांव नसे वा गाव नसे, क्रियापदाचे रूप नसे. शब्द अक्षरावटीतला ओळखण्याचा खेळ असे


चपखल

चपखल हे कोडे नाही तर आपण सर्रास वापरत असलेल्या इंग्लिश शब्दाला मराठीत काय म्हणावे हे ठरवण्याचा प्रयत्न आहे.

आशिश महाबळ यांचे नवे कोडे पाहण्यासाठी येथे जावे: शब्दखूुळ

मराठीचे जतन हा ‘एकं’ चा हेतू आहे.

वर्षानुवर्षे परदेशात राहिल्यामुळे मराठीचा हात आपल्या हातातून सुटतो आहे अशी खंत काहीजणांना आहे. मराठी शाळेत जाऊन मराठी शिकलेल्या ‘देशी’ मुलांना शिकलेली मराठी टिकवायची आहे.

‘आम्हाला वाचायला काय आहे? आम्हाला मराठी बोलायचे आहे, पण घराशिवाय कुठे बोलतां येईल?’ असे त्यांचे प्रश्न आहेत. काहीजणांना बोललेले समजते पण देवनागरी लिपीची सवय सुटल्यामुळे लिहिणे वाचणे कठीण झाले आहे. 

या पार्श्वभूमीवर ‘एकं’ ची स्थापना झाली आहे.

पुढे वाचावे…

ऐका हो ऐका! झालाच!

काय झालाच?‘शब्दयोग’, १५ गुणिले १५ आकाराच्या नियमबद्ध शब्दकोड्याचा समक्ष खेळ! रंगमंचावरून तीन खेळाडूंनी तोंडी खेळलेला!
कुठे? बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या विसाव्या अधिवेशनात, ॲटलांटिक सिटी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये
कधी? ऑगस्ट १३, २०२२ सकाळी १०:३० ते १२:०० दरम्यान
कधी ऐकलं नव्हतं. कसं ऐकणार? हा इतिहासात पहिल्यांदाच ‘एकं’ने सादर केला आहे.
कसा झाला? प्रेक्षकांना आवडला, ‘खूप छान झाला’ हे त्यांनी लगेच सांगितलं.
आम्हाला पाह्यचा आहेमग इथे टिचकी मारा.

हे शब्दकोड्याचं पुढचं पाऊल जरा लहान मुलाच्या पहिल्या पावलासारखं आहे! आपण आमचे मराठी बांधव, म्हणून आपल्याला कौतुकाने दाखवतों आहोत.

आमची प्रतिक्रिया कुठे कळवायची?इथे टिचकी मारा.

 

एकोपा ऑगस्ट २०२४

एकोपा मे २०२४

एकोपा फेब्रुअरी २०२४

एकोपा नोव्हेंबर २०२३

विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने केलेले

१. ‘एकं’च्या मराठीचे जतन या उद्दिष्टाविषयी सुषमा येरवडेकर यांचे निवेदन

आणि

२. नितिन जोशी यांनी ‘एकोपा’ या नव्या प्रकाशनाविषयी आणि सुषमा येरवडेकर यांच्या नियमबद्ध मराठी शब्दकोड्यांविषयी दिलेला अभिप्राय.

वाचकांच्या प्रतिक्रिया