एकोपा २०२५ वार्षिक वर्गणी इ.
(जानेवारी ते डिसेंबर) अमेरिकन डॉलर्समध्ये.
नव्याने छापील अंक घेणाऱ्या वर्गणीदारांनी कृपया आपला संपूर्ण पत्ता (अमेरिकन पत्ता असल्यास ९ आकडी झिप कोडसह) पुढील ईपत्त्यावर कळवावा.
आधीची वर्गणी राहिली असल्यास ती प्रथम भरावी.
वर्गणी भरण्यासाठी ही कळ दाबावी
वर्गणीचे दरः
- चार पटांक (Online) US$२०/-
- सर्वसमावेशक दोन छापील आणि चार पटांक US$४५/-
अंक प्रकाशनाची रूपरेषा
- फेब्रुअरी (मराठी राजभाषा दिन) छापील
- मे श्रवणांक
- ऑगस्ट (ज्ञानेश्वर जयंती) छापील
- नव्हेंबर श्रवणांक
देणगी:
अमेरिकन अंतर्गत महसूल नियमावली (Internal Revenue Code) मधील 501(c)(3) विभागानुसार aickum.org ला फेडरल करापासून मुक्तता मिळाली आहे. त्याअर्थी अमेरिकन करदात्यांची देणगी करमुक्त ठरेल. मग ती ‘एकं’साठी असो, किंवा ‘एकोपा’साठी असो. देणगीच्या बदल्यात अंक पाठवणे नियमात बसत नाही
कृपया देणगीचा स्वतंत्र चेक aickum.org साठी लिहावा. मेमोमध्ये देणगीचा तपशील लिहावा, उदा. Donation to Ekopa (OR aickum.org)
छापील जाहिरातीचे दर:
(सेवाभावी संस्थांना सवलत २५%)
- मलपृष्ठ: US$ ५००/-
- मुख व मलपृष्ठांच्या मागील पान: US$ ४००/-
कृष्णधवल (B/W)
- पूर्ण पान (७.५” गुणिले १०”): US$ ३००/-
- अर्धे पान: US$ २००/-
- पाव पान: US$ १००/-
छापील अंकातील जाहिरात त्या त्या पटांकातही येईल.
वर्गणी, देणगी किंवा जाहिरातीचा आकार भरण्यासाठी https://www.aickum.org या संस्थळावरील पेपालची सोयच वापरावी म्हणजे वर्गणी तत्काळ नोंदणीच्या ईमेलशी जोडली जाते आणि पूर्ण पटांक/श्रवणांक खुले होतात.
वर्गणी (किंवा भेटवर्गणी) चेकने, झेलने किंवा वैयक्तिक पेपालने भरली तर वर्गणी भरल्याचे आणि वर्गणीदाराने नोंदणी कोणत्या ईमेलने केली ते sampadak@ekopa.us येथे ईमेलने कळवले तरच वर्गणी त्या ईमेलशी जोडतां येते. मगच पूर्ण पटांक/श्रवणांक खुले होतात.
चेकने भरण्याची माहिती:
चेक aickum.org साठी लिहावा. (कॅनडातून आपल्या अमेरिकन डॉलर्सच्या खात्यातून चेक पाठवतां येईल) मेमोमध्ये त्याचा तपशील (Ekopa 2025 Subscription/ Ad for Ekopa issue – – / Donation to Ekopa or aickum.org) लिहून चेक पुढील पत्त्यावर पाठवावा.
aickum.org
2737 Devonshire Place NW #214
Washington DC 20008-3468 USA
झेलने भरण्याची माहितीः (झेल अमेरिकेत चालते.)
जर झेल (Zelle, mobile banking app) वापरून वर्गणी, जाहिरातीचा आकार किंवा आपली करमुक्त देणगी पाठवायची असेल तर आपल्या झेलमध्ये
sushamayera@yahoo.com हा ईपत्ता वापरावा व सोबत तपशील (Ekopa 2024 Subscription/ Ad for Ekopa issue – – -/ Donation to Ekopa or aickum.org) लिहावा. नंतर नोंदणी करण्यास विसरू नये.
नवीन वर्गणी?
१.ekopa.us वर नोंदणी (sign up) करावी. २.‘एकोपा’खालील ‘वर्गणीपत्रक’मध्ये आपली (किंवा भेट) वर्गणी आणि वर्ष निवडावे. ३. एकंच्या पेपालवरची ‘गेस्ट’ची विनामूल्य सोय वापरून किंवा स्वतःच्या पेपाल खात्यावर लॉगिन करून क्रेडिट कार्डने वर्गणी भरावी. स्वतःचे पेपाल वापरल्यास वर्गणी तत्काळ नोंदणीला जोडली जात नाही. वर्गणीची/ देणगीची/जाहिरातीची रक्कम sampadak@ekopa.us या एकंच्या खात्यावर पाठवावी. Memoमध्ये Subscription & Year/ Ad for Ekopa issue/ Donation to Aickum or Ekopa हे लिहावे. भारतातून पेपाल वापरताना आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्डवरचा डॉलर्सचा पर्याय स्वतःच खुला करावा लागतो.
धन्यवाद मंडळी!