चपखल – १

 

एकोपा पटांकामधील ‘चपखल’ नेहमीच्या प्रतिसादकांपर्यंत, ते पृष्ठांकाचे चाहते असल्यामुळे, पोचले नसावे म्हणून त्यात विचारलेला सध्याचा बहुचर्चित शब्द, त्यांच्यासाठी, पुन्हा समर्पक मराठी पर्याय शोधण्याकरिता दिला आहे.

विषाणुचा फेरा, घोर घरादारा!
नको त्याला थारा? तर हातचा मळ वारा,
दुरूनच वावरा, हवा गाळून वापरा
तोंडची वाफ आवरा, न चुकतां वापरा
— काय?
मास्क – Mask!

मास्क या रोजच्या वापरातल्या इंग्लिश शब्दाला आपले सोपे, सुटसुटीत, समर्पक मराठी पर्याय लौकरात लौकर sampadak@ekopa.us येथे पाठवावेत. पुढच्या अंकात त्याचा परामर्श घेतला जाईल.

केवळ प्रतिशब्द सुचवला म्हणून तो लगेच रूढ होईल असे नाही. कारण बहुसंख्य लोकांना पटला, त्यांच्या पचनी पडला आणि त्यांनी आवडीने वापरला तरच तो शब्द रूढ होतो. जसा मूळच्या व्हायरस (virus)साठी ‘अतिसूक्ष्म रोगाणु’ ऐवजी आता विषाणु रूढ झाला आहे तसा. या उलट शंभराहून अधिक वर्षे आपल्याकडे माहिती असलेला टेलिफोन मात्र लेखी दूरभाष किंवा दूरध्वनी म्हणून पटला आहे, पण पचनी पडलेला नाही. तो फोनच राहिला आहे.

‘विषाणु’ हा पर्याय ‘व्हायरस (virus)’साठी १९७०च्या सुमारास प्रथम मी उपयोगात आणला होता हे नमूद करण्यास आनंद वाटतो. (त्याच्या धुमाकुळाचा अर्थातच विषाद वाटतो.)

 

Please login to see this page.