आपल्या प्रश्नांचीं उत्तरे

 

होय. 'एकता'ने पूर्णविराम घेतला तेव्हा आपले 'एकता'चे आजीव सदस्यत्वही संपले.

'एकोपा' हा अमेरिकेतून नव्याने चालू झालेला सर्वस्वी नवीन उपक्रम आहे, त्याची वर्गणी नव्यानेच भरली पाहिजे.

Yes. Your 'Ekata' life membership ended with 'Ekata'.

'Ekopa' is a completely new project started from America. So you have to subscribe to it anew.

नाही. व्याजाचे दर नगण्य आणि खर्च बहुधा वाढते, या पार्श्वभूमीवर 'एकोपा' सारख्या नव्या प्रकाशनाने दीर्घ मुदतीचे करार न केलेले बरे. आपण वार्षिक वर्गणी भरावी हे उत्तम. नवीन उपक्रम म्हणून 'एकोपा'ला आर्थिक हातभार लावण्याची इच्छा असेल तर वर आणखी देणगी द्यावी. अमेरिकन करदात्यांना ती करमुक्त आहे.

No. With interest rates negligible but expenses usually increasing, a new publication like 'Ekopa' is better off not making long term contracts. It's best that you take an annual subscription.

If you wish to help 'Ekopa' financially, you may want to donate to 'Ekopa' over and above your subscription, the donation amount will be tax-deductible for American taxpayers.

२०२१ मध्ये दोन छापील अंक: मराठी राजभाषा दिन (फेब्रुअरी) ज्ञानेश्वर जयंती (ऑगस्ट) आणि चार पटांक: (फेब्रुअरी, मे, ऑगस्ट आणि नव्हेंबर) काढण्याचा बेत आहे. फेब्रुअरी आणि ऑगस्टचे छापील अंक वाचण्यासाठी पडद्यावरही उपलब्ध होतील. तर मे आणि नव्हेंबर हे श्रवणांक म्हणजे Audio अंक असतील.

For 2021, two print issues (Marathi Rajabhasha Din- February and Dnyaneshwar Jayanti- August) and 4 Pataank (online) issues (February, May, August and November) are planned. February and August print issues will be available as online issues for reading online. May and November online issues will be Audio, for listening.

ज्यांना छापील अंक हातात घेऊन, हवा तेव्हा, हवा तेथे वाचायला आवडतो त्यांना तीन पर्याय आहेत

  1. दोन छापील अंक [मराठी राजभाषा दिन (फेब्रुअरी) ज्ञानेश्वर जयंती (ऑगस्ट)] $३०/
  2. ज्यांना छापील अंकच आवडतो, पण प्रवासात किंवा घराबाहेर असताना तो पडद्यावर वाचतां येणे सोयिस्कर वाटते त्यांना - दोन छापील आणि चार पटांक (म्हणजे पडद्यावरचा अंक, e-magazine) $४५/
  3. जे मुख्यतः छापील अंकच वाचतात पण ज्यांना मधल्या (मे, नव्हेंबर) दोन पटांकांचा लाभ घ्यायचा आहे त्यांना- $३५/

जे केवळ पडद्यावरच वाचतात त्यांना एकच सोपा पर्याय आहे: चार पटांक - $ २०/

Those who like to read a print issue whenever and wherever, have three options:

Two print issues (Marathi Rajbhasha Din- February and Dnyaneshwar Jayanti- August) only: $30.

Those who like to read the print issue but could use the convenience of reading the print issue online when they are traveling or away from home: 2 print issues and all four online issues [All Inclusive]:$45.

Those who mainly read the print issue but would like to avail themselves of the interim (May and November) Audio Pataank (online issues) [Combo]:$35.

For those who read exclusively online, there is one simple option: All 4 online issues: $20.

आपण कोणासाठी भेट पाठवणार आणि कोणत्या वर्गणीची हे 'एकोपा'ला कळवावे.

जर भेटवर्गणी केवळ छापील अंकांची असेल तर त्यांचा संपूर्ण पत्ता (अमेरिकन पत्ता, +४ आकडी झिप कोडसह) कळवावा. म्हणजे छापील अंक त्या पत्त्यावर पाठवतां येतील. जर भेटवर्गणीत पटांक असतील तर त्यांचा ईपत्ता आम्हाला कळवावा. त्यांना त्याच ईपत्त्याने ekopa.us येथे नोंदणी करायला सांगावे. म्हणजे 'एकोपा'ला वर्गणी मिळाल्यावर त्यांना पटांक वाचतां आणि ऐकतां येतील.

Let 'Ekopa' know who the subscription is for and what kind of subscription. If the subscription is for Print issues only, please let us know the receipient's complete postal address (With 9-digit zip code if the address is American).

If the gift subscription includes Online Issues. please let us know the email of the gift receipient. Please ask them to sign in at <ekopa.us> with that email so after their subscription has been recieved, they can read and listen the online issues.

१. कॅनडातील कित्येक बॅंकांमध्ये अमेरिकन डॉलर्सच्या खात्याची सोय आहे. आपले कनेडियन खाते तसे असेल तर आपण वर्गणीचा चेक aickum.org या नांवाने अमेरिकन डॉलर्समध्ये लिहून मेमोमध्ये 'Ekopa 2021 Subscription for ------(वर्गणीदाराचे नांव)' असे लिहावे. (हे भेटवर्गणी भरताना विशेष महत्त्वाचे) चेक पुढील पत्त्यावर पाठवावा.

aickum.org
2737 Devonshire Place NW #214
Washington DC 20008-3468.
USA

किंवा आपण आपल्या बॅंकेला विचारल्यास आपल्या वतीने बॅंकच aickum.org च्या नांवाने आपण सांगितलेल्या रकमेचा ड्राफ्ट आपल्याला देऊ शकेल तो आपण वर दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. म्हणजे वर काही फी पडू नये. आपल्या बॅंकेकडूनच आपल्याला याची निश्चित माहिती कळेल.

कनेडियन डॉलर्समध्ये लिहिलेला चेक वटायला वेळही लागतो आणि 'एकोपा'ची बॅंक चेकची रक्कम अमेरिकन डॉलर्समध्ये बदलण्याचा आकार लावते त्यामुळे वर्गणीची पूर्ण रक्कम 'एकोपा' ला मिळत नाही.

. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम आणि भारत येथून पेपालची एकवेळपुरती क्रेडिट कार्डने पैसे पाठवण्याची असलेली सोय आहे ती वापरून घरबसल्या संगणकावरून वर्गणी भरणे सोपे आहे पेपालचा आकार आपल्या रकमेतूनच 'एकोपा'कडून घेतला जातो. म्हणजे 'एकोपा'ला पूर्ण रक्कम मिळत नाही. हे आपल्याला खटकत असेल तर आपण वर्गणीच्या रकमेत २ ते ५ अधिक डॉलर्स घालावेत.

1.Many Canadian banks offer a US dollar account. If your Canadian bank does so, you could write the subscription check for aickum.org and write 'Ekopa 2021 subscription for – -- in the Memo. (This is especially important for the Gift subscriptions.)

Please mail the check to

aickum.org
2737 Devonshire Place NW # 214
Washington DC 20008-3468
USA.

Or if you ask at your bank, the bank may give you a draft for aickum.org for the amount you request in US dollars which you can mail to the address given above, so there should be no extra fee. Only your bank can give you definite information about this.

Checks written in Canadian dollars take longer to deposit and are charged a fee, so 'Ekopa' does not recieve the full amount of subscription.

2. For Canada, Australia, United Kingdom and India, PayPal's one time (guest) facility may be used with one's credit card. Paypal handles the transaction for a fee, so 'Ekopa' does not receive the full amount. If this bothers you, you could add 2 to 5 dollars to the subscription amount.

aickum.org ही (501) c (3) कलमाखाली करमाफी मिळालेली लाभनिरपेक्ष संस्था आहे त्या अर्थी आपण तिच्यासाठी किंवा 'एकोपा'साठी दिलेली देणगी अमेरिकेत करमुक्त ठरेल. बाहेरदेशातूनही देणगी देतां येईल.
आपल्या नातेवाईकांसाठी किंवा स्नेह्यांसाठी 'एकोपा'ची वार्षिक वर्गणी भेट म्हणून भरतां येईल.

aickum.org is a registerd (501) (c) (3) Non Profit Corporation, so your donation to aickum.org or Ekopa will be tax-deductible for American taxpayers. People from abroad may donate too.
You can gift Ekopa annual subscriptions to your family or friends.

नोंदणी (विनामूल्य) केल्यावर अनुक्रमणिका आणि इतर काही मजकूर चाळतां येईल. वर्गणी भरल्यावर संपूर्ण अंक वाचतां येईल.

Yes, once you sign in for free, you could see the index and some content.

Once you subscribe, you can read the entire issue.