पहिल्या श्रवणांकावरील प्रतिक्रिया

मे २०२१चा एकोपाचा अंक श्रवणीय करण्याची कल्पना स्तुत्य आहे. आम्हाला फार आवडली. आणि विशेषतः विनायकना, कारण डोळ्याच्या त्रासामुळे त्यांचे हल्ली वाचन होत नाही. गेल्या दीडदोन वर्षांत त्यांची दृष्टी बरीच कमी झाली आहे. सगळे लेख एका दमात त्यांनी ऐकले आणि सर्व लेखक माहितीचे असल्याने त्या सर्वांचे आवाज ऐकून फारच खूष झाले.

सर्व लेखकांचे व सुषमा, तुझे खूप अभिनंदन.

   -प्रतिभा आणि विनायक गोखले, टोरांटो, कॅनडा.