अर्थात्
ऊर्फ
तेच ते
अर्थात् हे सर्वस्वी नवीन कोडे मी एकताच्या ऑक्टोबर २०१९ च्या अंकात प्रथमच सादर केले होते.
‘झोपी गेलेला जागा झाला अर्थात् राणा भीमदेव’ किंवा ‘संशयकल्लोळ अर्थात् तसबिरींचा घोटाळा’ अशा पल्लेबाज शीर्षकांतून मी अर्थात् हा शब्द, विचारलेले शब्द समानार्थी असल्याचे सूचित करण्यासाठी घेतला आहे.
अर्थात् कोड्यामध्ये दिलेल्या शब्दांतलीं अक्षरें लपवलीं आहेत; शीर्षरेखा, काना, मात्रा, वेलांटी, हीं लेखनचिन्हें तेवढीं प्रकट केलीं आहेत. जोडाक्षर आहे की नाही याविषयी मूग गिळले आहेत. त्या दिलेल्या शब्दांतच एक नियोजित शब्द आहे.
दिलेल्या खूणगाठीवरून हे समानार्थी शब्द ओळखायचे आणि त्यातला एक, नियोजित शब्द शोधायचा.
अक्षरावटीत लपवलेले सगळे शब्द आणि त्यांतला नियोजित शब्द अचूक ओळखणारे उकलकरी यशस्वी! अचूक सोडवणाऱ्या उकलकऱ्यांचीं नांवें मानपटावर झळकतील.