खिरापत

 

नांव नसे वा गाव नसे, क्रियापदाचे रूप नसे
शब्द अक्षरावटीतला ओळखण्याचा खेळ असे ।

 

‘ता’ ऐकतांच ‘ताकभात’ ओळखणे म्हणजे चाणाक्षपणा. मग लेखी शब्दात केवळ दुसऱ्या ‘क’ आणि चौथ्या ‘त’ वरून तोच ‘ताकभात’ नेमका ओळखणे म्हणजे चाणाक्षपणाचा कळस नाही का? अगदी उडत्या पाखराचीं पिसं बरोब्बर मोजण्यासारखाच! म्हणूनच ‘खिरापत’ या खेळात दिलेल्या अक्षरावटीतले दुसरे आणि चौथे अक्षर पाहून पूर्ण चार अक्षरी शब्द ओळखायचा आहे.

_ क _ त या अक्षरावटीवरून नेमका नियोजित शब्द ताकभात ओळखायचा आहे, चाकवत किंवा एकमत नाही. (दहा अंदाजांत).