भाषेच्या बाबतीत ‘वापरा नाहीतर विसरा’ असा प्रकार असतो. आपल्याला भरपूर मराठी शब्द माहिती असतात, पण ते वापरायची वेळ कुठे येते? मग ते जातात आठवणींच्या बासनात, तिथे त्यांचं काय होतं ते सांगायलाच नको.
इथे लहान खिरापत किंवा अर्थात् पासून ते मोठ्या १५ गुणिले १५ आकाराच्या (न्यू यॉर्क टाईम्स प्रमाण) नियमबद्ध शब्दकोड्या पर्यंत संवादी कोडीं पडद्यावरच सोडवतां येतील अशा प्रकारे मांडलीं आहेत. जरूर सोडवून पाहावीत.
मराठी वर्णमालेप्रमाणे केलेला खास मुद्रापट आपल्या सेवेला सिद्ध आहे. सवयीने नक्कीच सोपा वाटेल.
चपखल हे कोडे नाही तर आपण सर्रास वापरत असलेल्या इंग्लिश शब्दाला मराठीत काय म्हणावे हे ठरवण्याचा प्रयत्न आहे. विचार करावा लागेल, पण सर्वांनी मनावर घेतलं तर कोणी सांगावं? मिळेलसुध्दा एखादा चपखल मराठी पर्याय. तो पुढे रुळणे, न रुळणे हे जनतेच्या मर्जीवर. पण आपण पर्याय तर शोधला!